विश्व हिंदू परिषद बजरंग दल बजरंग दल वाकी बु तर्फे वृक्षारोपणाचा उपक्रम ..
वाकी बु l : पावसाच्या सरीनी जोर धरला असताना वाकी बु गावामध्ये”झाडे लावा, झाडे जगवा “हा उपक्रम हाती घेऊन स्मशान भुमी परिसर, महादेव मंदिर,बैलगाडा घाट, पिरसाहेब डोंगर, गणपती मंदीर
परिसरात विविध झाडांची लागवड करण्यात आली.
गावामध्ये बजरंग दल च्या वतीने प्रथमच हा उपक्रम हाती घेऊन यशस्वी करण्यात आला. लावलेल्या सर्व झाडाचे संगोपन केले जाईल असे बजरंगीच्या वतीने सांगण्यात आले.या उपक्रमासाठी सरपंच सोनलताई टोपे,सदस्य – रमेश टोपे, उद्योजक गौरव टोपे,जिवन टोपे विकास टोपे,प्रदिप टोपे, नितीन टोपे व गावातील महिला बचत गटाच्या उषा टोपे,सायली पंडित,अश्विनी टोपे
बजरंग दल वाकी संयोजक किरण जाधव,सहसंयोजक शुभम टोपे, सुरक्षा प्रमुख गणेश टोपे, साप्ताहिक मिलन प्रमुख देवा जाधव,निहाल जाधव,कल्पेश जाधव,संघटक तेजस थिटे,अक्षय टोपे व सर्व गोरक्षक व बजरंगी यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.