मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून वाकी येथे मोफत कायदे विषयक शिबिराचे आयोजन….
वाकी बु : आज वाकी बुद्रुक गावामध्ये मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त खेड तालुका विधी सेवा, वकील संघटना राजगुरुनगर व ग्रामपंचायत वाकी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कायदेविषयक मार्गदर्शन आयोजित केले होते त्यानिमित्ताने जिल्हा न्यायाधीश मा. श्री. सय्यद साहेब, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मा. घनीवाले साहेब, तसेच दिवाणी न्यायाधीश मा. संदीप पवार साहेब खेड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष माननीय संजय गोपाळे सर तसेच बहुसंख्येने वकील उपस्थित होते कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहराचा कार्यक्रम झाला. लोकनियुक्त सरपंच ॲड. सोनल विनोद टोपे यांनी सर्वांचे आभार मानले.