बॉलिवूडचा खिलाडी राजकारणाच्या आखाड्यात उतरणार? लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता

[ngd-single-post-view]

कोणी सिनेअभिनेत्याने राजकारणात येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. हा ट्रेंड जुना असून अशा बातम्या वेळोवेळी येत असतात. कधी एखादा मोठा सेलिब्रिटी चित्रपट सोडून राजकारणात येतो तर कधी या बातम्या खोट्या निघत असतात. अक्षय कुमार राजकारणात सामील होणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडलाय. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसंदर्भात एक मोठी बातमी हाती आलीय. चित्रपट क्षेत्रात सुपरहिट ठरलेला अभिनेता अक्षय कुमार राजकारणाच्या क्षेत्रातही आपला जलवा दाखवणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेता अक्षय कुमार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपकडून अक्षय कुमारला लोकसभेसाठी तिकीट मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत जागा वाटपासाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्येही वाटाघाटी झाल्या आहेत. यामुळे दिल्लीचं रण मारण्यासाठी भाजपने तयारी सुरू केलीय.

कोणत्या जागेवर कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यावी याची चाचपणी केली जातेय. यावेळी काही जागांवर नवे चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खासदारांचा ट्रॅक रेकॉर्ड, एमसीडी निवडणुकीतील पराभव आणि काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन भाजप यावेळी दिल्लीतील लोकसभेच्या ५ किंवा कदाचित ७ही जागांवर नवे चेहरे उभे केले जाऊ शकतात, अशी चर्चा जोर धरू लागलीय.


Websites Views :

page counter