पुणे । पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कुंजीरवाडी येथे ही घटना घडली. सोमवारी दुपारी ही घटना घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पुण्यातील कुंजीरवाडी परिसरात मुलाला शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीस्वार दोघांनी सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली आहे. महिलेने या दोघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु अज्ञात चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली. कुंजीरवाडीतील मारुती मंदिरासमोर ही घटना घडली आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.
सोनसाखळी चोरी प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलिसांत धाव तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. चोरट्यांनी तब्बल १.३५ लाख रुपयांचे सोन्याची दागिने चोरले आहेत.