आमदार शेळके यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे अजित पवारांकडे मागणी

[ngd-single-post-view]

 

  • मावळ -विधानसभा मतदासंघातील विक्रमी मतांनी विजयी झालेले आमदार सुनील शेळके यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
  • राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण अध्यक्ष संदिप आंद्रे, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, तसेच रूपेश घोजगे, साईनाथ गायकवाड, संतोष कोंढरे, विवेक काळोखे, निलेश दाभाडे, बळीराम मराठे, रवि पोटफोडे, भरत भोते, संजय मोहोळ, मंगेश राणे, रुपेश गायकवाड, परेश बरदाडे, दत्ता शिंदे,दत्ता रावते, गणेश राणे आदी
  • पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे 
  • उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. आमदार शेळके यांनी गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४ हजार कोटींचा निधी आणून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावले आहेत. या निवडणुकीत आमदार शेळके यांनी १ लाख ८ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला असून, उपमुख्यमंत्री पवार यांचे शिलेदार म्हणून आमदार शेळके हे काम करत आहे हेही अभिमानास्पद आहे.
  • नव्याने स्थापन होणाऱ्या महायुती सरकारमध्ये आमदार शेळके यांना मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी संदीप आंद्रे व पंढरीनाथ ढोरे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे या वेळी केली आहे.

Websites Views :

page counter