येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या बहु प्रतिक्षिप्त जन्म स्थळ स्मारकाचे भूमी पूजन आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
महाराष्ट्र सरकारने नुकतेच या कामी १०२ कोटी ४८ लक्ष रुपये मंजूर केले आहेत,त्या निधीतून हुतात्मा राजगुरू यांच्या बलिदान , त्याग यांना साजेसे भव्य दिव्य स्मारक निर्माण होणार आहे.गेली तीस वर्षे हुतात्मा राजगुरू स्मारक होणे कामी विविध संस्था संघटना प्रयत्नशील आहेत.अखेर आता स्मारक बांधकाम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख व सदस्य गेली अनेक दिवस याबाबत पाठपुरावा करत आहे.
आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांनी मागील. वर्षीच्या अर्थ संकल्प अधिवेशनात या स्मारक बांधकाम कामी लक्षवेधी सूचना मांडली होती.सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत समिती तयार करून विकास आराखडा तयार करण्यात आला होता.या आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यात आली.यातून स्मारक बांधकाम कामी व भू संपादन कामी १०२ कोटी ४८ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.
या स्मारक बांधकामाचे भूमिपूजन आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी आमदार मोहिते म्हणाले गेली अनेक वर्षे हुतात्मा राजगुरू स्मारक कामी पाठपुरावा सुरू होता,या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार देवेंद्र फडणवीस,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या सर्वांचे योगदान लाभले, हुतात्मा राजगुरू स्मारकालगत नवीन झालेल्या पुलाचे उद्घाटन पुढील काळात लवकरच करणार आहे.हे स्मारक राजगुरुनगर शहराच्या वैभवात भर घालणारे होईल.देशातील अनेक देशभक्त,युवक येथे येऊन हुतात्मा राजगुरू यांच्या बलिदानाचे स्मरण करून देशभक्तीच्या प्रेरणा घेऊन जातील.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर,कात्रज डेअरी संचालक अरुण चांभारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास लिंभोरे, संचालक भरत कड , माजी सभापती अशोक राक्षे,चंद्रकांत दादा इंगवले, विनायक घुमटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलताई चांभारे महिला शहर अध्यक्ष ॲड.मनीषा पवळे,शहर अध्यक्ष सुभाष होले,युवक अध्यक्ष सागर सातकर ,पी.एम. आर. डी.संचालक वसंत भसे , तसेच ऍड.निलेश आंधळे, स्विय सहाय्यक सतीश कदम, संतोष सांडभोर,बाळासाहेब सांडभोर, ऍड.सूनिल वाळुंज ,अमित घुमटकर ,योगेश पवार ,संतोष भांगे, किशोर ओसवाल,शुभम सोनवणे यांसह मोठ्या संख्येने नागरिक ,महिला उपस्थित होत्या.
या स्मारक बांधकामाच्या नासदिय कंपनी पुणेच्या वास्तुविशारद अर्चना देशमुख यांनी यावेळी स्मारक बांधकाम आराखडा कसा असेल ही माहिती दिली.सवानी हेरिटेज पुणे कंपनीचे राहुल चव्हाण यांनी विविध नकाशे यावेळी सादर केले.
कार्यक्रम संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सागर सातकर, स्वीय सहाय्यक सतीश कदम, ऍड निलेश आंधळे, इजाजभाई तांबोळी शुभम सोनवणे यांनी केले.
कार्यक्रम पौरोहित्य अवधूत प्रसादे,सूत्रसंचालन कैलास दुधाळे ,प्रास्ताविक मधुकर गिलबिले,आभार ॲड.निलेश आंधळे यांनी मानले.
हुतात्मा राजगुरू जन्म स्थळ स्मारकाचे भूमी पूजन संपन्न
[ngd-single-post-view]