शिरूर पुरवठा विभागात अनागोंदी कारभार तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना त्रास

शिरूर पुरवठा विभागात अनागोंदी कारभार तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना त्रास
शिरूर पुरवठा विभागात अनागोंदी कारभार तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना त्रास
[ngd-single-post-view]

शिरूर पुरवठा विभागात अनागोंदी कारभार तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना त्रास

सर्वर च्या नावाखाली सर्व सामान्य लोकांची  पिळवणूक कार्यालयामध्ये सगळ्या प्रभारी कारभाराला जबाबदार कोण 

योगेश पडवळ, पाबळ

शिरूर तालुक्यातील पुरवठा विभागात चक्क एका रेशनकार्ड वरील नाव कमी करण्यासाठी पूर्ण दिवसभर पुरवठा विभागाच्या दरात तास न-तास बसून सुद्धा काम झाले नाही,असा प्रकार घडून आलेला आहे. सर्व ग्रामीण व शहरी भागातील लोकांना पुरवठा विभागात आपल्या शिधापत्रीकातील नाव कमी करणे, नाव वाढवणे , नवीन रेशन कार्ड काढणे, या साठी शिरूर येथे यावे लागते परंतु ते पुरवठा विभागाच्या दरात गेल्यावर त्या ठिकाणी बाहेरील फलक वाचून परतीचा मार्ग दाखवला जात असल्याचा प्रकार निदर्शनात आला आहे. मग पुरवठा विभागातील कर्मचारी कुठले काम दिवसभर करत असतात असा प्रश्न सर्व सामान्य नागरीकांना पडताना दिसून येत आहे.

पुरवठा विभागात जाणाऱ्या संबंधित व्यक्तीला त्यांना आपल्या कामाची ऑनलाईन प्रक्रिया करून आणण्यासाठी परत परतीचा मार्ग दाखवला जात आहे. आपण ऑनलाईन नोंदणी बाहेरून किंवा स्वतः करून घ्या असे सांगितले जाते मोलमजुरी करणारे शेतकरी कुटुंबातील सर्वसाधारण व्यक्ती पुरवठा विभागाच्या समोरील बोर्ड वाचून पुन्हा आपल्या गावी जातात,शासनाने शासकीय अधिकारी वर्ग नेमून दिलेला आहे. तो फक्त आपल्या खिरापत दाराची कामे करण्यात व्यस्त आहे.

आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची रेशनकार्ड ऑनलाइन असणे आवश्यक असल्याने अनेक नागरिक कित्येक दिवस यासाठी या कार्यालयात चकरा मारताना दिसतात. यावर जिल्हापुरवठा विभागाने कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत येते,मात्र या विभागाचे कामकाज सुरळीत होताना दिसत नाही या सर्व कामासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. या विभागात आपण तातडीने फेरबदल करून या विभागाचे कामकाज सुरळीत करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त करत आहे..

कार्यालयात सगळ्या प्रभारी कारभार असल्यामुळे व तालुक्याला पूर्ण वेळ पुरवठा निरीक्षक लक्ष देत नसल्यामुळे जनतेची अनेक कामे खोळंबली आहे “भीक नको पण कुत्रा आवरा अशी अवस्था शिरूरकरांची झाली.
मग सर्व सामान्य नागरिकांची कामे करणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला


Websites Views :

page counter