राजगुरुनगर शहरात राज्य हादरून टाकणारी घटना… दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार खून करून बॅरल मध्ये टाकले…!!

[ngd-single-post-view]

खेड : दोन लहान मुलींवर अत्याचार करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी (दि २६) उघडकीस आला. पीडिता (वय ९) व निर्भया (वय ८) अशी मयत मुलींची नावे आहेत. नऊ आणि आठ वर्षांच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत, त्यालगत असलेल्या एका बियर बारमध्ये काम करीत असलेल्या सहा परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह मिळुन आले असल्याचे बोलले जात आहे.

पीडिता आणि निर्भया या बुधवारी दुपारी खेळताना गायब झाली दुपारी शोध घेण्यात आला; मात्र मिळुन न आल्याने पीडिता आणि निर्भया या बुधवारी दुपारी खेळताना गायब

झाल्यावर शोध घेण्यात आला; मात्र मिळुन न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती. दोघी सख्या बहिणी असुन बाहेरगावाहून मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचे समजते. हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार खेड पोलीसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळ लगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी अवघे गुडघा भर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळुन आल्या असे सांगण्यात आले. दोघींचे मृतदेह यशवंतराव चव्हाण रूग्णालयात शवविच्छेदणासाठी नेण्यात आले. हरवलेल्या तक्रारीची शहानिशा करताना दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळुन आल्या आहेत. याची सखोल चौकशी सुरू आहे, असे पोलिस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले. त्यांच्यावर अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असेही ते म्हणाले दरम्यान, राजगुरुनगर येथील धनराज बार मधील वेटरने हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली. संशयित आरोपी हा ५० ते ५५ वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी लगेच माहिती देण्यास नकार दिला. तपास सुरु असून खून का करण्यात आले याची अजून कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही.


Websites Views :

page counter