मावळ- मावळ विधानसभा मतदारसंघाचे आजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार बाँनर. बाजी सुली केली आहे.आमदा सुनील शेळके समर्थकांनी एका प्रसिद्ध उच्च शिखरावर मोठा बॅनर लावून आमदार सुनील शेळके यांची महायुती सरकार मध्ये मंत्री पदी वर्नीलागवी आशा भावना व्यक्त करत बाँनर लावले आहेत…
.या बॅनरवर “मावळच्या विकासासाठी सुनील शेळके यांना मंत्रिपद मिळालेच पाहिजे!”असा संदेश देण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा असून, शेळके समर्थकांचा हा हि बाँनरबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आमदार सुनील शेळके यांनी मावळ मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत, ज्यामुळे त्यांचे समर्थक त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे,अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. तसेच, मंत्रीपदाच्या माध्यमातून मावळच्या विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांचा आहे.
सध्या राज्य महायुती सरकार च नवीन मंत्रिमंडळ स्थापन होनार आसुन त्या मंत्री मंडळात त्याना स्थान मिळनार का शेळके समर्थकांची ही मागणी यशस्वी ठरणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.