खेडचा तहसीलदारांकडे दहा लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोघांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

[ngd-single-post-view]

 

राजगुरुनगर : दिनांक २९/११/२०२४ रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान राजगुरुनगर तहसील कार्यालयात हजर असताना सुनील किसन नंदकर खेळत असेल कार्यालय नावाचे अनाधिकृत शिक्के वापरून त्यावर स्वाक्षरी केलेली आहे.

सौ. स्नेहल महेश नेहरे या नावाचे बनावट रेशनिंग कार्ड असून त्या आधारे तहसीलदार ज्योती देवरे यांना तुमच्या कार्यालयाने बनावट रेशन कार्ड दिलेले असून तुम्ही मला दहा लाख रुपये सामाजिक कामासाठी द्या मी तक्रार मागे घेतो असे म्हणून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. 

याप्रकरणी अक्षय मोहन कोरपे यांनी महेश नेहरे, राहणार वाडा तालुका खेड व  सुनील नंदकर, राहणार घोडेगाव यांच्या विरोधात खेड पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८(२),३३८,३४०(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.


Websites Views :

page counter