आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी महिला व योग शिक्षकावर चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल… गुन्हा दाखल करण्याच्याअनेक दिवसांच्या कुटुंबयांच्या मागणीला यश…!!

[ngd-single-post-view]

चाकण : एक महिला आणि योग शिक्षकाने तिच्या प्रियकराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्रास दिला. ते सतत शिवीगाळ आणि अपमान करत होते. ही घटना चाकण येथील श्रीरामनगर येथे 1 ऑगस्ट ते 18 ऑक्टोबर दरम्यान घडली. छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली.

सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय 27, रा. चाकण) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ श्रीकांत रामदयाल प्रजापती (वय 25) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगशिक्षक बापू सोनवणे यांच्यासह महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि मृत सूर्यकांत यांचे संबंध होते. मात्र, तिला आणि आरोपी योग शिक्षक बापू सोनवणे यांनी सूर्यकांतला लैंगिक अत्याचाराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. ते सतत शिवीगाळ आणि अपमान करत होते. याला कंटाळून सूर्यकांतने १८ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.


Websites Views :

page counter