पुणे जिल्ह्यातील ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील जिहादी अल्ताफ इनामदार याने केला अल्पवयीन पीडितेवर बलात्कार…
जुन्नर : राज्यभर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील एक अल्पवयीन पिडीता गेल्या पाच महिन्यापासून बेपत्ता असल्याचे लक्षात आले तसेच तिला पळवून नेणारा जिहादी मानसिकतेचा आरोपी अल्ताफ शाबुद्दीन इनामदार याच्या मुस्क्या ओतूर पोलिसांनी आवळल्या आहेत.
जुन्नर तालुक्यातील मांदारणे या गावात जलजीवन मिशनचे कामावर जेसीबी चालक म्हणून आलेला अल्ताफ याने पीडितेच्या घरासमोरील ओट्यावर वारंवार बसून पीडीतेशी ओळख वाढवून, तिचा मोबाईल नंबर घेऊन तिचे व तिच्या आईचे झालेले भांडणाचा गैरफायदा घेऊन विश्वास संपादन करून फूस लावून पिडीतेला पळवून नेले व त्याचा वाघोली येथील साथीदार प्रेम ढगे याच्या मदतीने फ्लॅट घेऊन तेथे पिडीतेवर ती अल्पवयीन आहे हे माहीत असताना दोन वेळा बलात्कार केला.
त्यानंतर पुन्हा खेड तालुक्यातील सेलू गावात कचाटे वस्ती येथे राहत असताना वेळोवेळी बलात्कार केला.यापूर्वी पीडिता ही फेब्रुवारी महिन्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद पीडीतेच्या आईने ओतूर पोलीस स्टेशनला दिली होती. ओतूर पोलिसांनी तपास करून खेड तालुक्यातील महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मदत घेऊन आरोपीच्या दिनांक २६/०८/२४ रोजी मुस्क्या आवळल्या आहेत.
आरोपी अल्ताफ याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास मोठे जन आंदोलन उभे करण्याचा इशारा बजरंग दलाचे ओतूर येथील अमोल रावत यांनी दिला आहे.
दरम्यान जिहादी आरोपी अल्ताफ याला राजगुरुनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सूनावली आहे.