खेड विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा नक्की उमेदवार कोण? सगळेच उमेदवार सध्या मीच उमेदवार म्हणून स्वयंघोषित?

[ngd-single-post-view]

प्रतिनिधी – श्री योगेशभाऊ लंघे 

महाराष्ट्र विधानसभेचे वातावरण सध्या तापलेले दिसते .कारण पण तसंच आहे. महाविकास आघाडी व महायुती हे तीन – तीन पक्षांचे गट तयार झाले त्यामध्ये आता तिसरी आघाडी सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तिकडे राजू शेट्टी व बच्चू कडू हे तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. इकडे पुणे जिल्ह्यामधील इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील हे महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.

पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर आंबेगाव जुन्नर खेड हडपसर भोसरी हे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघाला कनेक्ट आहेत .शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांना जुन्नर आंबेगाव शिरूर खेड व हडपसर या मतदार संघातून लीड भेटले. सर्वात जास्त लीड त्यांना खेड तालुक्यातून भेटले. आता ह्याच खेड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याचा मोठा पेच निर्माण झालाय. कारण तिकडे माजी आमदार विलासराव लांडे नातेवाईक सुधीर मुंगसे हे सुद्धा उमेदवारीसाठी तळ ठोकून आहेत. प्रचाराच्या गाड्या त्यांच्या सुद्धा फिरताना दिसत आहे ‌‌गाड्यांना त्यांचे होर्डिंग लागलेले आहेत आता लक्ष खेड विधानसभेचे अश्या नावाने बॅनर गाड्यावर आहेत.

 

म्हणून दुसरीकडे भाजपमधून शरद पवार गटात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अतुलभाऊ देशमुख हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द तर दिला नाही ना.. अशा सुद्धा चर्चा होत आहेत.

इकडे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे बाबाजीशेठ काळे हे सुद्धा रिंगणात आहेत विद्यमान आमदार दिलीप (आण्णा)मोहिते पाटील यांना ह्या गोष्टीचा पुरेपूर फायदा होऊ शकतो .लढत जर चौरंगी झाली तर ह्या चौरंगी लढतीमध्ये दिलीप मोहिते पाटील यांचा पारडे जड मानले जाते. तिकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाबाजीशेठ काळे हे सुद्धा रिंगणात आहेत. महिलांच्या देवदर्शनाच्या ट्रिपा असतील. किंवा बैलगाडा शर्यत असेल या सर्वांमध्ये खेड तालुका अग्रेसर आहे. खेड तालुक्यामध्ये सर्वात जास्त बैल शर्यत भरवली जाते. शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघातील मानाने महिलांच्या ट्रिपा व इच्छुक उमेदवार हे तुल्यबळ आहेत. त्यामुळे ही लढत 100% चौरंगी जर झाली तर याचा फायदा कुठेतरी विद्यमान आमदाराला होऊ शकतो. म्हणजे जे गणित शिरूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक वेळी खेड तालुक्यातील लोकांनी जे महाविकास आघाडीला मताधिक्य दिलं .

तेच मताधिक्य विधानसभेला मिळू शकतं असं नाही गट ताटाचा फटका 100% महाविकास आघाडीला बसू शकतो असं सुद्धा मानलं जातं. आता महाविकास आघाडी आपल्या समन्वयक बैठकीमध्ये काय तोडगा काढते हे पहावे लागेल महाविकास आघाडी कडून उमेदवारांची संख्या वाढल्याने प्रत्येक उमेदवार हात तुल्यबळ असणारे नक्की उमेदवारी कोणाला हा मोठा पेज निर्माण झालाय त्यामध्ये सुधीरभाऊ मुंगसे, अतुलभाऊ देशमुख, बाबाशेठ काळे, ही तीन नावे अग्रेसर आहेत…


Websites Views :

page counter