भाई काल तुरूंगातून सुटला, फुकटची हवा करणं नडलं…आज पु्न्हा तुरूंगात

0
180
[ngd-single-post-view]


  • हर्षद पाटणकर हा गुन्हेगार जेलमधून सुटून आला आणि पुन्हा जेलमध्ये गेला. नाशिकमध्ये ही घटना घडली आहे. जेलमधून बाहेर आल्याच्या उत्साहात काढलेली मिरवणूक त्याच्या अंगलट आली

नाशिक: नाशिक पोलीसांनी गुन्हेगार हर्षद पाटणकरला चांगलाच धडा शिकवला आहे. कालच कारागृहातून सुटून आलेल्या भाईला पुन्हा एकदा कारागृहात पाठवण्यात आलं आहे. कारागृहातून सुटललेल्या गुन्हेगाराची नाशिक शहरात काढलेली जंगी मिरवणूक आणि सत्कार चांगलाच महागात पडला आहे. या संपूर्ण मिरवणुकीचा आणि या सत्कार सोहळ्याचा व्हिडियो सोशल मीडियावर टाकला आणि पोलिसांच्या हाती लागताच सुमोटो कारवाई अंतर्गत भाईंना पुन्हा पोलिसांनी जेलवरीला पाठवले.

नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हर्षदला जुलै मध्ये2023 एमपीडीए कायद्यानुसार नाशिक रोड कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले होते. त्यानंतर हर्षदची मंगळवारी कारागृहातून सुटका झाली. सुटकेनंतर हर्षद आणि त्याचे साथीदार शांत राहिले असते तर नवल. त्यांनी हर्षदची जंगी मिरवणूक काढली.

त्यामुळे बेथेलनगर येथील त्याच्या मित्रपरिवारासह समर्थकांनी त्याच्या स्वागत मिरवणुकीचे नियोजन केले. त्यानुसार मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 च्या सुमारास बेथेलनगर, आंबेडकर चौक, साधु वासवानी रोड, शरणपूर रोड या मार्गावर कार क्र. एमएच 15, जीएक्स 8721 मधून हर्षदची मिरवणूक काढली. त्यात त्याच्या मित्रपरिवाराने व समर्थकांनी आरडाओरड करीत अर्वाच्च घोषणाबाजी केली. वाहनांचा विनाकारण हॉर्न वाजवत दहशत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पाटणकरसह मिरवणुकीत सहभागी असलेल्या सात जनावर गुन्हा दाखल केला.

या आधीही कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांसह त्यांच्या समर्थकांनी शहरात मिरवणुका काढत गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत करण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली होती, तरीदेखील असे प्रकार सुरूच आहेत. त्याचप्रमाणे असे रील्स टाकून प्रतिस्पर्धी टोळ्यांनाही अप्रत्यक्षरीत्या आव्हान देण्याचे प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. आता या घटनेमुळे शहरात गुन्हेगारीचं उदात्तीकरण करू पाहणाऱ्यांना जरब बसतेय का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 


Websites Views :

page counter