विश्व हिंदू परिषद बजरंग दला तर्फे राजगुरुनगर येथे महा रक्तदान सप्ताहाचे नियोजन …

[ngd-single-post-view]

विश्व हिंदू परिषद बजरंग दला तर्फे राजगुरुनगर येथे महा रक्तदान सप्ताहाचे नियोजन …

राजगुरुनगर : दि.१४/०७/२४ रोजी आयोजित बजरंग दलाचे नेते कै.धर्मवीर चंद्रशेखर (अण्णा) बाणखेले यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त राजगुरुनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथे रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात एकूण २५० रक्तदात्यांनी आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक रक्तदान केले. यावेळी मानद प्राणी कल्याण अधिकारी मुंबई मंत्रालयॲड.निलेश आंधळे,बजरंग दल जिल्हा गोरक्षा सहप्रमुख दीपक गावडे, वैशालीताई लांडगे हे रक्तदान शिबिरास उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी खेड ग्रामीण प्रखंड मंत्री स्वप्निल साळुंके, संयोजक प्रतीक दौंडकर ,योगेश पवार, सोन्या साळुंखे, योगीराज करवंदे ,राजेश लांडे ,प्रतीक थीगळे ,भूषण चौधरी, समीर वाडेकर ,बंटी वाडेकर, शुभम बोराडे ,केतन थीगळे , विवेक वाळुंज, विश्वजीत आहेर या सर्वांनी कष्ट घेतले.
सर्व रक्तदात्यांस बजरंग दलाच्या वतीने एक भेटवस्तू , तसेच झाडे लावा, झाडे जगवा अंतर्गत वृक्ष घरपोच देण्याचे नियोजन करण्यात आले. त्याच बरोबर वर्षभरात गरज लागल्यास लागल्यास मोफत रक्ताची पिशवी देण्यात येणार आहे. या महारक्तदान सप्ताह च्या अंतर्गत आजपर्यंत १३९० युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यावर्षी आषाढी एकादशीपर्यंत ३००० रक्तपिशव्या संकलित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे बजरंग दल जिल्हा (पुणे ग्रामीण) सहसंयोजक अवधूत चौधरी यांनी सांगितले.


Websites Views :

page counter