अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का? दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवारांची साथ धरणार?
शिरूर लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला चांगलं यश मिळालेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी सर्व आमदारांची नुकतीच बैठकही घेतली आहे. या बैठकीला सहा आमदार उपस्थित नव्हते. हे सर्व आमदार त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नव्हते असं अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. पण आता अजित पवार गटातील एक मंत्री त्यांना पाठ दाखवण्याची चर्चा आहे. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा माजी मंत्री शरद पवार यांची साथ धरणार असल्याची चर्चा आहे. वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी ट्विट केलेल्या पोस्टमुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. अश्या बातम्या देखील न्यूज चॅनल ला फिरत आहेत…
शिरूर लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “डॉ अमोल कोल्हे साहेब यांचा दणदणीत विजय; मनःपूर्वक अभिनंदन”, असा मजकुर टाकत त्यांनी सोशल मीडीयावर खासदार कोल्हे यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या विजयी झाल्याबद्दलही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पूर्वा वळसे पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार?
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षात येण्यास इच्छुक असल्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. तर पूर्वा वळसे पाटील या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
रोहित पवारांनीच काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं अजित पवार गटातील 15 ते 16 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत.
आमचे काही माणसं महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात होते त्यामुळे पंधरा दिवसात त्यांना पक्षप्रवेश करावा लागेल काही दिवसातच तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल असा रोहित पवार यांचं वक्तव्य होते त्यातच दिलीपराव वळसे पाटील हे प्रचारदरम्यान आजारी पडल्याचे दिसले होते परंतु दोनच दिवसापासून ते सक्रिय झाल्याचे दिसल्याने आंबेगाव तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा ना उदान आले आहे.