*श्रीनाथ मेटल्स, खेडसिटी कनेरसर च्या वतीने मुक्या जनावरांना चारा वाटप.
कडाक्याच्या उन्हाळ्यात गोशाळेतील मुक्या जनावरांना चाऱ्याची गरज असल्याने *श्री क्षेत्र भीमाशंकर येथील “श्री समर्थ गोशाळा”* येथे *श्रीनाथ मेटल्स चे एम.डी. श्री बाळासाहेब पाचारणे* यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी प्रमाणे याही वर्षी एक पीक अप भरून मुरघास पशू खाद्य पोहोच करण्यात आले.
गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या जय गोमाता प्रतिष्ठान मार्फत श्री क्षेत्र भीमाशंकर येथे गोशाळा चालविण्यात येते. सदर गोशाळेत कत्तलीपासून वाचविलेले तसेच वृध्द व अपंग गोवंश यांचे संगोपन केले जाते. सध्या गोशाळेत १६० लहान मोठे गोवंश असल्याचे गोशाळेचे अध्यक्ष श्री बाळासहेब शंकर कौदरे यांनी सांगितले.
याप्रसंगी श्रीनाथ मेटल्स चे श्री संदिप पाचारणे, अभिषेक पाचारणे, नवनाथ सांडभोर, रोहित निकम, स्वप्नील ढमाले, प्रशांत शिवेकर आदी उपस्थित होते.