- सध्या देशभर लोकसभेचा झंजावात सुरू आहे ओपनिंग पोल नुसार मोदी सरकार पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे . परंतु महाराष्ट्रामध्ये काही असेही लोकसभा मतदारसंघ आहेत. जिथे पूर्ण महाराष्ट्राचे काय देशाचे सुद्धा लक्ष लागून आहे.पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघ हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला भेटणार आहे हे मात्र नक्की .शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला तीन टर्म खासदार झालेले.
व पाचव्यांदा लोकसभा निवडणूक लढणारे शिवाजीराव आढळराव पाटील व गेल्या पंचवार्षिकला निवडून आलेले अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात पुन्हा दंड थोपटून उभे आहेत. आढळराव पाटलांचा जर इतिहास पाहिला लोकसभा निवडणूक लढण्याच्या आधी त्यांनी कोणतीही निवडणूक लढलेली नाही. त्यांनीच काय त्यांच्या कुटुंबीयातील कोणीही निवडणूक लढलेली नाही. हुशार व्यक्तिमत्व उद्योगपती जनसामान्यांमध्ये प्रचलित कार्यकर्ते कधीही उपलब्ध असणारे नेते असा त्यांचा स्वभाव. या स्वभावाचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे .
शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक वाडवस्ती व त्या गाव पंचायत समिती गण महायुतीतील सर्व घटक पक्ष त्यांचे नेते पदाधिकारी. सर्वांच्या मीटिंग घेऊन सर्वांना कार्यपद्धती सांगून जनतेने महायुतीचा उमेदवार कसा निवडून द्यायचा व कसे कामाला लागायचे हे सांगीतले आहे.व याची मोठ्या प्रमाणात प्रचारांमध्ये अग्रेसर व आघाडी घेण्याचे काम शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेला आहे. त्याच्या उलट डॉक्टर अमोल कोल्हे विद्यमान खासदार हे मात्र कुठेही सभा घेताना मीटिंग घेताना दिसत नाहीत. टोमॅटोच्या बाजारभावाची एक क्लिप स्वतःच्या फेसबुक पेजला अपलोड करून .चुकीचा मेसेज जनतेमध्ये पोहोचवण्याचा व्हायरल होत आहे .हा व्हिडिओ क्लिप जुनी असून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही स्वतःच्या पेजला टाकल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्याने मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग चा सामना करावा लागत आहे.
शेतकरी बाजार भाव अडीशे रुपये टोमॅटोला असताना .तो 50 ते 60 रुपये असल्याचं स्वतःच्या पेजला टाकल्याने शेतकरी वर्ग नाराज झालेला आहे. काहींच्या मते खासदार साहेबांना जर हेच माहीत नाही टोमॅटोला बाजार भाव किती. तर खासदार साहेब शेतकऱ्यांसाठी करणार काय. सध्या प्रचाराची परिस्थिती पाहिली तर शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रचारामध्ये सर्व ठिकाणी आघाडी वर असल्याचे पाहायला मिळत आहे .शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये हडपसर व भोसरी मतदारसंघांमध्ये जवळपास 53 टक्के मतदार आहेत .तर बाकीचे उरलेले मतदान हे आंबेगाव शिरूर खेड जुन्नर या तालुक्यांमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार त्यातील तीन आमदार अजित पवार गटातील एक आमदार शरद पवार गटातील एक आमदार भाजपचा असे बलाबल शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाकडे चार तर शरद पवार गटाकडे एकच आमदार आहे. व राहिलेल्या भाजपचा आमदार ते सुद्धा महायुतीमध्ये आहे.त्यामुळे सर्वात जास्त पारडं जड हे शिवाजीराव आढळराव पाटील यांचे असल्याचे पाहायला मिळत आहे.अजित दादा पवार यांनी आमदारांना एक प्रकारे तंबीच दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्व आमदार ही हडपसर भोसरी या ठिकाणच्या शहरी भागाच्या मतदानावर आहे.
ग्रामीण भागामध्ये पाहिलं जुन्नर तालुका हा डॉक्टर अमोल कोल्हे यांचे निवासस्थान तर शिवाजीराव पाटील यांचे आंबेगाव तालुका हे निवासस्थान त्यामुळे ह्या दोन तालुक्यामधून कोणाला जास्त तालुका लिड देतो हे पाहणे औत्सुक्याचे होणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांचा कार्यकाळ हा खूपच निराजनक असल्याचे सर्वे मधून सिद्ध होतं आहे .खासदार निधी मधला 20% निधीच खर्च करून बाकीचा निधी त्यांनी खर्चच केला नाही अशी कागदपत्रेही दिसत आहे.जर खासदारांनी 20 टक्के निधीच खर्च केलेला दिसत आहे. तर खासदारांनी 19 हजार कोटींची कामे आणली कशी. स्वताचा खासदार निधीतून कामे न करता दुसरा निधी कुठुन आणला..हा मोठा प्रश्न जनसामान्यामध्ये पडलेला पाहायला मिळतो.
त्यामध्ये एक साधं उदाहरण पाहायला गेलं केंद्र सरकारने लसीकरण केले परंतु ते लसीकरण डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विकास कामांच्या यादीमध्ये आहे. आता हे किती सत्य त्यांनाच माहिती. त्यानी कुठुन लसीकरण केले हे त्यांनाच माहिती.त्यामुळे खासदार अमोल कोल्हे हे भाषण करण्यात मात्र पटाईत आहेत हे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील याचे आरोप किती सत्य आहे हे स्वता कोल्हे साहेबच सांगतील . आढळराव पाटील कामाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात अग्रेसिव असल्याचे पाहायला मिळत आहे. पक्ष फुटीचा त्रास ग्रामीण भागात जास्त असून तो शांत झाल्याचे पहावयास मिळते आहे.शहरी भागात याची झळ अजिबात नाही. हे मात्र नक्की त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांचं शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या तरी पारडे जड असल्याचे पाहायला भेटत आहे.