- शिक्रापूर मार्गावर असलेल्या रासे फाट्यावरील हॉटेल मराठा मध्ये हॉटेल चालकावर हॉटेल मध्ये आलेल्या तिघांपैकी एकाने गोळीबार केला तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी डोक्याला चाटून गेली. स्वप्निल उर्फ सोप्या शिंदे (वय -32, रा.रासे ता. खेड )याच्यावर गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.यातील आरोपी अजय गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर आरोपी राहुल पवार व तिसरा फरारी आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर , चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,स्वप्नील शिंदे उर्फ सोप्या याच्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. स्वप्निल शिंदे हॉटेलमध्ये असताना तिघेजण हॉटेलमध्ये आले त्यांच्यात शाब्दिक वादविवाद झाले. त्यानंतर एकमेकांना धक्काबुक्की ही झाली.
तिघांपैकी एकाने तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी स्वप्निल उर्फ सोप्या शिंदे याच्या डोक्याला चाटून गेली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड,पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले. पोलिसांना हॉटेलमध्ये एक राउंड सापडला.
गोळीबार जुन्या वादातून झालेला आहे. स्वप्नील उर्फ सोप्या शिंदे याच्यावर गोळीबार करण्यात आला हा शिंदे सुद्धा तडीपारीतला आरोपी आहे. तसेच अजय गायकवाड व राहुल पवार हे तडीपारितले दोघे आरोपी आहेत. या घटनेनंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली. राहुल पवार व दुसरा आरोपी पळून गेला तर पोलिसांनी अजय गायकवाड याला ताब्यात घेतले आहे, त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.अजय गायकवाड, राहुल पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले आहे.रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार झाला. राहुल पवार याच्या भावाचा काही महिन्यापूर्वी महाळुंगे येथे खून झाला होता. स्वप्नील शिंदे हा सुद्धा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तो तडीपारी झालेला आहे तसेच राहुल पवार, अजय गायकवाड हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.