डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पुणे मनपाचे क्रीडाधिकारी….

[ngd-single-post-view]

डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पुणे मनपाचे क्रीडाधिकारी….

राक्षेवाडी :

डबल महाराष्ट्र केसरी शिवराज काळुराम राक्षेला पुणे महानगरपालिकेत क्रीडाधिकारी म्हणून शासकीय नोकरी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिपत्रक काढून तसे आदेश पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. या नियुक्तीने शिवराजच्या कष्टाचे चीज झाल्याच्या भावना राक्षेवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.एकनाथ शिंदे यांनी शासकीय

नोकरीत घेण्याचा निर्णय परिपत्रक

काढून घेतला.खेड तालुक्यातील राक्षेवाडीच्या शेतकरी कुटुंबात शिवराज चा जन्म झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवराजला क्रीडाधिकारी या पदाचे पत्र देण्यात आले. या वेळी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई व शिवराजचा भाऊ युवराज राक्षे हे उपस्थित होते. राक्षे कुटुंबातील शिवराज राक्षेने कुस्ती क्षेत्रात डबल महाराष्ट्र केसरी किताब मिळविला आहे. एकदा नाही, दोनवेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे कौतुक करून नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशनात त्याची नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न केले. शिवराजला वडिलांकडून कुस्तीचे धडे मिळाले आहेत. शिवराजचे वडील काळुराम व आजोबा यांनी देखील पैलवानकी करताना अनेक मैदाने गाजवली आहेत. काळुराम हे शेतीबरोबर दुधाचा व्यवसाय करतात. आई सुरेखा राक्षेवाडीच्या सरपंच आहेत. भाऊ. चुलते यांनीही शिवराजला वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या तालमीत शिवराज सराव करीत आहे.क्रीडाधिकारी या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे, माजी उपसभापती सतीश राक्षे, माजी सदस्य जितेंद्र राक्षे, उपसरपंच मच्छिंद्र राक्षे, पोलिस पाटील पण्णूकाका राक्षे, सदस्य रविराज राक्षे, जितेंद्र सांडभोर, सविता राक्षे, श्रद्धा सांडभोर, वैजयंता थिटे, चांगुणा थिटे आदींसह ग्रामस्थांनी शिवराजचे अभिनंदन केले.


Websites Views :

page counter