ईअर टॅगींग केले तरच पशुधनाची वाहतूक……पशुबाजार समित्या; आठवडी पशु बाजारातील खरेदी-विक्रीवर आली बंधने…

[ngd-single-post-view]

.पुणे : पशुपालक, शेतकरी आणि जनावरांचे व्यापारी यांना आता पशुधनाच्या ईअर टॅगिंगकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार १ एप्रिल २०२४ नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही. १ जून २०२४ पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावांतील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केला आहे. यामुळे बेकायदा कत्तलींनादेखील आळा बसणारा आहे.

 

उपलब्ध होते. १२ डिसेंबर २०२३ रोजीच्या विविध दोन आदेशान्वये केंद्र शासनाने जन्माला येणाऱ्या व मृत पावणाऱ्या पशुधनाच्या जन्ममृत्यूच्या नोंदी आणि कत्तल होणाऱ्या सर्व पशुधनाच्या नोंदी भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक केले आहे.

 

घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतर यांचा समावेश आहे. थोडक्यात सदर प्रणालीवर संबंधित पशुधनाची प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू, इ. सर्व माहिती

 

  1. भारत पशुधन प्रणालीवर पशुधनास उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या औषधांबाबतच्या नोंदी या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, सदर नोंदींच्या आधारे राज्यात अथवा राज्याच्या काही भागात पशुंमध्ये अस्तित्वात असलेल्या आजाराबाबत आगाऊ माहिती मिळून, इतर भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सुलभ होते. त्यामुळे पशुधनाची जीवितहानी तसेच, पशुधनापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरील विपरीत परिणाम टाळणे शक्य होते.

 

या पार्श्वभूमीवर पशुधनावर दैनंदिन प्रतिबंधात्मक उपचार तसेच, आजारादरम्यान देण्यात येणाऱ्या औषधांबाबतच्या नोंदी भारत पशुधन प्रणालीवर नियमितरित्या करण्याबाबत केंद्र शासनाने तसे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांना यापूर्वीच दिले आहेत. ४ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये १ जून २०२४ पासून कत्तल होणाऱ्या प्रत्येक पशुधनास ईअर टॅग असणे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे जनावरांच्या बेकायदा कत्तलीला देखील आळा बसणार असल्याचे या अध्यादेशामुळे स्पष्ट झाले आहे. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणा बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरित अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित

 

टॅगिंगमुळे असा होणार फायदा

 

विभागाद्वारे शासनाच्या पशुसंवर्धन नॅशनल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये इंजर टॉगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकष नोंदी

 

■ १ जून २०२४ नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था / दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देता येणार नाही. ■जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या (Forceful Culing) पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र

 

पशुपालकाची

 

व राज्य शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळणार नाही. ■ राज्यांतर्गत विक्रीकरिता वाहतूक करण्यात येणाऱ्या राज्यातील पशुधनास ईअर टॅगिंग केल्याचे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात्री करूनच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्र, तसेच सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाहतूक प्रमाणपत्र द्यावे.

 

राहील. ग्रामपंचायतीमार्फत पशूंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईजर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्यावर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा, असे आदेश या अध्यादेशामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.

 

■पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार.

 

■ ईअर टॅग नसलेले पशुधन बाजारसमितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित बाजार समितीला घ्यावी लागणार आहे.

 

आता कसायांवर देखील बंधने येतील.या शासन निर्णयामुळे बेकायदेशीर जनावरांच्या वाहतुकीवर देखील आळा येईल. जनावरांचा खरा मालक कोण हे शोधणे सोपे होणार असून कत्तलीसाठी होणाऱ्या वाहतुकीत जनावरे देणारा आणि विकत घेणारा यांना आरोपी करता येणार आहे. राज्यभरातील गोरक्षकाना तसेच पशुप्रेमीना महाराष्ट्र शासनाने तसेच तुकाराम मुंडे साहेबांनी दिलेली भेट आहे.

 

ॲड.निलेश बाळासाहेब आंधळे

(मानद प्राणी कल्याण अधिकारी मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र शासन)


Websites Views :

page counter