पुणे (जिल्हाधिकारी कार्यालय) : खेड तालुक्याचे तहसीलदार यांच्याविरोधात प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार त्यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडून कारवाई केली जाणार आहे.
खेडच्या तहसीलदारांच्या विरोधात खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मागील नागपूर येथिल अधिवेशनात झालेल्या अधिवेशनात लक्षवेधी क्रमांक १९८५/२०२३ उपस्थीत केलेली होती.खेड आळंदी (ता.जि.खेड) येथे कार्यरत असलेल्या तहसिलदाराने पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन अवैध वाहतुकीस व गौण खनिज उत्खन्नास बेकायदेशीररित्या परवानगी देत असल्याचे माहे नोव्हें. 2023 रोजी वा त्यासुमारास उघडकीस येणे, तद्संबंधी वकील संघटनेने संबंधित तहसिदार विरुध्द मा. जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे तक्रार केली असणे, परंतु प्रशासन तक्रार अर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असणे, सदर तहसिलदाराने चंद्रपूर जिल्हयातील जिवती तालुक्यातील मौजा कुसुंबी गावठाणासह 24 आदिवासी नागरिकांच्या 63.62 हे. आर जमिनीच्या झालेल्या गैरव्यवहारास शासनाकडून विभागीय चौकशी करण्यांत येणे, रेशन दुकानावर तक्रार दाखल करण्याकरिता लाच मागणी प्रकरणी तक्रार माहे जून, 2023 करण्यांत आली असणे, परंतु संबंधित तहसिलदार आजमितीस कोणतीही कारवाई न होणे. यावर शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची भूमिका.असे या लक्षवेधी सूचनेचे स्वरूप होते.
या तहसीलदार महोदयांवर सामान्य नागरिकांची कामे न करणे, त्यांना चांगली वागणूक न देणे, विविध प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना आर्थिक तडजोडी करणे, नियमबाह्य कामकाज असे विविध आरोप गेल्या वर्षाच्या अखेरीस राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील वकिलांनी केले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. ‘खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर झालेल्या आरोपांवर निर्णय घ्या, असे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे बुधवारी नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने बारामती येथे गेले होते. त्यामुळे निर्णय घेता आला नाही. राज्य शासनाच्या आदेशाबाबत गुरुवारी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी स्पष्ट केले.
याबाबत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना फोनद्वारे संपर्क केला असता त्यांनी देखील या बातमीला दुजोरा दिला असून याबाबतचा आदेश प्राप्त होताच पत्रकार परिषद घेऊन अधिक महिती दिली जाईल असे सांगितले.