प्रतिनिधी – वैभव काळे पाटील
मंचर : आंबेगाव तालुक्यात वेगवेगळी महाविद्यालये आहेत.येथे कॅफे शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी मोबदला घेऊन जागा उपलब्ध करून तरूण मुलामुलींना देण्यात येत आहे. मंचर पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे युवा कार्यकर्ते कल्पेश अप्पा बाणखेले, रामदास जाधव यांनी केली.
मंचर येथे महाविद्यालय तसेच असलेल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील व इतरही तरुण मुले-मुली यांना कॅफे शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी कॅफेत छोटेखानी कम्पार्टमेंट उपलब्ध करून देण्यात येत आहे. कम्पार्टमेंटला चोहोबाजूंनी पडदा टाकून यासाठी २०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान चार्ज आकारला जात आहे. या प्रकारची चर्चा मंचर शहरात असताना पोलीस प्रशासन मात्र असल्या हीन प्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या कॅफेकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या अश्लील प्रकाराला मंचर पोलिसांनी पायबंद घालावा अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला.