मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस च्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता. शिरुर ची जागा व आढळराव पाटील ‌यांची राष्ट्रवादी काँग्रेस ने माघणी केल्याचे खात्रीलायक सूत्रांची माहिती?

[ngd-single-post-view]

मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस च्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता. शिरुर ची जागा व आढळराव पाटील ‌यांची राष्ट्रवादी काँग्रेस ने माघणी केल्याचे खात्रीलायक सूत्रांची माहिती?

 

  1. लोकसभा निवडणुकीचा संग्राम जरा जवळ येत चालला आहे. तशी उमेदवारी कोणाला याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र मध्ये भाजपा २८ शिवसेना १४ व राष्ट्रवादी काँग्रेस ६ असे जागा वाटप जवळपास निश्चित झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात तसे पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदाराची संख्या जास्त आहे. परंतु लोकसभा लढवेल असा उमेदवार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ने चाचपणी केली असता तगडा उमेदवार त्याना मिळाला नसल्याचे बोलले जाते. त्या मुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या तिकीट वर‌ लढण्याची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदाराची संख्या जास्त असल्याने उमेदवार पण राष्ट्रवादी काँग्रेस च्या असावा असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस च्या आहे. त्यात जागा कमी असल्याने कसल्याही परिस्थितीत मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघ काबीज करायचा आहे असे अजित पवार यांनी सांगितल्याचे बोलले जाते. तिकीट व शिवाजीराव आढळराव पाटील .हे दोन्ही ची माघणी केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.. कारण अमोल कोल्हे यांना आढळराव सोडून तगडा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस कडे आता तरी नाही… त्यात असणार्या आमदारांना अजित पवार यांनी तंबीच दिल्याचे बोलले जात आहे.. त्यामुळे त्यात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना चॅलेंज करुन सांगितले आहे की ह्या निवडणूक मध्ये तुला पाडणारच… त्यामुळे पुर्ण ताकदीने अजितदादा पवार शिरूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार हे मात्र नक्की.. त्यामुळे आढळराव पाटील यांच्या कडे आत्ता ३ पर्याय आहेत एक तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणे. दुसरा पर्याय. राष्ट्रवादी काँग्रेस च्या तिकीटावर निवडणूक लढवणे.व तिसरा पर्याय. निवडणूक न लढवता शांत बसणे… तर यात आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस च्या तिकीटावर निवडणूक लढवतील हे फिक्स आहे. असे बोलले जात आहे… त्यामुळे अजित पवार यांचे दबावतंत्र अखेर यशस्वी झाले असल्याचे दिसत आहे…

Websites Views :

page counter