माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत आले तर मी घरी बसेल……आ. दिलीप मोहिते पाटील यांची आढळराव पाटलांवर नाराजी…!!
मुंबई : शिरूर लोकसभेच्या जागेसाठी मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्री यांच्यात चर्चेची खलबत सुरू आहेत. लवकरच या जागे संदर्भात उमेदार कोण असणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यातच शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रवेशाबद्दल नाराजी व्यक्त करताना ज्यांनी मला जेलमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे पक्षात स्वागत करण्यापेक्षा मी घरी बसेन अशी प्रतिक्रिया दिली.
तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर चा लोकसभेचा उमेदवार मीच असणार असे माध्यमांशी बोलताना सांगितले. आता जोपर्यंत महायुतीचा लोकसभेचा उमेदवार ठरत नाही तोपर्यंत हा राजकीय मंडळींचा कलगीतुरा असाच चालणार अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे.