Home Blog

महायुती शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भिमनगर, मुंढवा पुणे येथे उपमहापौर नवनाथ कांबळे संस्थापक स्वप्निल गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे भेट दिली

0

महायुती शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भिमनगर, मुंढवा पुणे येथे उपमहापौर नवनाथ कांबळे संस्थापक स्वप्निल गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे भेट दिली

 

यावेळी आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, मतदारसंघ अध्यक्ष शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष संदीप बधे, विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे, भाजप सरचिटणीस गणेश घुले, मतदारसंघ अध्यक्ष संदीप दळवी, कार्याध्यक्ष हडपसर स्मिता दातीर बडदे, अध्यक्ष ओबीसी सेल हडपसर मोनिकाताई काळे, अन्न धान्य दक्षता समिती सदस्य महाराष्ट्र शासन राजू अडागळे, भाजप नेते प्रवीण जगताप, राकापा अध्यक्ष संजय लोणकर, शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, मनसे नेते बाबू वागस्कर, युवक अध्यक्ष राकेश कामठे, नगरसेविका नंदा लोणकर, वार्ड अध्यक्ष सोमनाथ गालभिडे, उपाध्यक्ष दिवाकर भाटरे, राकाँपा विधानसभा अध्यक्ष मोहन क्षिरसागर, हडपसर विधानसभा सरचिटणीस वैभव लोखंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

मा खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची प्रचारात आघाडी.तर खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पेज ला ‌जुने फोटो टाकुन शेतकऱ्यांनची दिशाभूल केल्याच व्हायरल.

0
  • सध्या देशभर लोकसभेचा झंजावात सुरू आहे ओपनिंग पोल नुसार मोदी सरकार पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे . परंतु महाराष्ट्रामध्ये काही असेही लोकसभा मतदारसंघ आहेत. जिथे पूर्ण महाराष्ट्राचे काय देशाचे सुद्धा लक्ष लागून आहे.पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघ हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला भेटणार आहे हे मात्र नक्की .शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला तीन टर्म खासदार झालेले.

व पाचव्यांदा लोकसभा निवडणूक लढणारे शिवाजीराव आढळराव पाटील व गेल्या पंचवार्षिकला निवडून आलेले अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात पुन्हा दंड थोपटून उभे आहेत. आढळराव पाटलांचा जर इतिहास पाहिला लोकसभा निवडणूक लढण्याच्या आधी त्यांनी कोणतीही निवडणूक लढलेली नाही. त्यांनीच काय त्यांच्या कुटुंबीयातील कोणीही निवडणूक लढलेली नाही. हुशार व्यक्तिमत्व उद्योगपती जनसामान्यांमध्ये प्रचलित कार्यकर्ते कधीही उपलब्ध असणारे नेते असा त्यांचा स्वभाव. या स्वभावाचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे .

शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक वाडवस्ती व त्या गाव पंचायत समिती गण महायुतीतील सर्व घटक पक्ष त्यांचे नेते पदाधिकारी. सर्वांच्या मीटिंग घेऊन सर्वांना कार्यपद्धती सांगून जनतेने महायुतीचा उमेदवार कसा निवडून द्यायचा व कसे कामाला लागायचे हे सांगीतले आहे.व याची मोठ्या प्रमाणात प्रचारांमध्ये अग्रेसर व आघाडी घेण्याचे काम शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेला आहे. त्याच्या उलट डॉक्टर अमोल कोल्हे विद्यमान खासदार हे मात्र कुठेही सभा घेताना मीटिंग घेताना दिसत नाहीत. टोमॅटोच्या बाजारभावाची एक क्लिप स्वतःच्या फेसबुक पेजला अपलोड करून .चुकीचा मेसेज जनतेमध्ये पोहोचवण्याचा व्हायरल होत आहे .हा व्हिडिओ क्लिप जुनी असून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही स्वतःच्या पेजला टाकल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्याने मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग चा सामना करावा लागत आहे.

शेतकरी बाजार भाव अडीशे रुपये टोमॅटोला असताना .तो 50 ते 60 रुपये असल्याचं स्वतःच्या पेजला टाकल्याने शेतकरी वर्ग नाराज झालेला आहे. काहींच्या मते खासदार साहेबांना जर हेच माहीत नाही टोमॅटोला बाजार भाव किती. तर खासदार साहेब शेतकऱ्यांसाठी करणार काय. सध्या प्रचाराची परिस्थिती पाहिली तर शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रचारामध्ये सर्व ठिकाणी आघाडी वर असल्याचे पाहायला मिळत आहे .शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये हडपसर व भोसरी मतदारसंघांमध्ये जवळपास 53 टक्के मतदार आहेत .तर बाकीचे उरलेले मतदान हे आंबेगाव शिरूर खेड जुन्नर या तालुक्यांमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार त्यातील तीन आमदार अजित पवार गटातील एक आमदार शरद पवार गटातील एक आमदार भाजपचा असे बलाबल शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाकडे चार तर शरद पवार गटाकडे एकच आमदार आहे. व राहिलेल्या भाजपचा आमदार ते सुद्धा महायुतीमध्ये आहे.त्यामुळे सर्वात जास्त पारडं जड हे शिवाजीराव आढळराव पाटील यांचे असल्याचे पाहायला मिळत आहे.अजित दादा पवार यांनी आमदारांना एक प्रकारे तंबीच दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्व आमदार ही हडपसर भोसरी या ठिकाणच्या शहरी भागाच्या मतदानावर आहे.

ग्रामीण भागामध्ये पाहिलं जुन्नर तालुका हा डॉक्टर अमोल कोल्हे यांचे निवासस्थान तर शिवाजीराव पाटील यांचे आंबेगाव तालुका हे निवासस्थान त्यामुळे ह्या दोन तालुक्यामधून कोणाला जास्त तालुका लिड देतो हे पाहणे औत्सुक्याचे होणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांचा कार्यकाळ हा खूपच निराजनक असल्याचे सर्वे मधून सिद्ध होतं आहे .खासदार निधी मधला 20% निधीच खर्च करून बाकीचा निधी त्यांनी खर्चच केला नाही अशी कागदपत्रेही दिसत आहे.जर खासदारांनी 20 टक्के निधीच खर्च केलेला दिसत आहे. तर खासदारांनी 19 हजार कोटींची कामे आणली कशी. स्वताचा खासदार निधीतून कामे न करता दुसरा निधी कुठुन आणला..हा मोठा प्रश्न जनसामान्यामध्ये पडलेला पाहायला मिळतो.

त्यामध्ये एक साधं उदाहरण पाहायला गेलं केंद्र सरकारने लसीकरण केले परंतु ते लसीकरण डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विकास कामांच्या यादीमध्ये आहे. आता हे किती सत्य त्यांनाच माहिती. त्यानी कुठुन लसीकरण केले हे त्यांनाच माहिती.त्यामुळे खासदार अमोल कोल्हे हे भाषण करण्यात मात्र पटाईत आहेत हे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील याचे आरोप किती सत्य आहे हे स्वता कोल्हे साहेबच सांगतील . आढळराव पाटील कामाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात अग्रेसिव असल्याचे पाहायला मिळत आहे. पक्ष फुटीचा त्रास ग्रामीण भागात जास्त असून तो शांत झाल्याचे पहावयास मिळते आहे.शहरी भागात याची झळ अजिबात नाही. हे मात्र नक्की त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांचं शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या तरी पारडे जड असल्याचे पाहायला भेटत आहे.

शिरूर तालुक्यातील केंदुर गावची कन्या स्नेहल राजाराम थिटे . ठाणे जिल्हा वनरक्षकपदी  

0

 

प्रतिनिधी -योगेश पडवळ

केंदूर (थिटेवाडी)ता.शिरूर येथील शेतकरी राजाराम जयवंत थिटे यांची कन्या स्नेहल राजाराम थिटे हिची महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग ठाणेच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती प्रक्रिया २०२४ तून ठाणे जिल्हात वनरक्षक पदी निवड झाली.सुरुवातीपासूनचेच हे तिचे ध्येय गाठण्यासाठी तिने आपार कष्ट घेतले. तिचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडी,पाचवी ते बारावीचे शिक्षण श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ या ठिकाणी झाले. स्नेहल सध्या वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ येथे पूर्ण करत आहे.ग्रामीण भागात राहूनही गेली दोन वर्ष अनेक समस्यावर मात करून तिने हे यश संपादन केले आहे तिच्या या यशाबद्दल श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय घोडेकर,श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अविनाश क्षीरसागर,उपप्राचार्य सुदाम पिंगळे,पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडीचे मुख्याध्यापक मंगेश गावडे यांनी अभिनंदन केले.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांसमोर स्नेहल थिटे ही आदर्श असल्याचे मत डॉ.संजय घोडेकर यांनी व्यक्त केले.माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी ता.आंबेगाव जि.पुणेचे सागर जाधव व प्रसाद चौधरी,राहुल पडवळ यांनी विशेष मार्गदर्शन केले तिच्या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिरूर तालुक्याचे माजी सभापती सदाशिवराव थिटे,जिल्हा परिषद सदस्या सविताताई बगाटे,शि.प्र.मंडळ पाबळचे अध्यक्ष सोपानराव जाधव,शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड.दत्तात्रय थिटे,केंदूरचे सरपंच अमोल थिटे,उपसरपंच भाऊसाहेब थिटे,उद्योजक सतिषदादा थिटे,मा.सरपंच तुकाराम थिटे,सुर्यकांत थिटे,सुनिल थिटे,मा.उपसरपंच भरत साकोरे,ज्ञानेशवर थिटे,गोरक्ष थिटे,उल्हास थिटे,विशाल थिटे,हरिश्चंद्र थिटे,मा.सदस्य मोहन थिटे,पंडीत थिटे,अविनाश थिटे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे यांनी विशेष कौतुक केले.

चाकण येथील रासे येथे हॉटेल मध्ये स्वप्नील शिंदे ऊर्फ सोप्या याच्यावर फायरींग…..

0
  • ­शिक्रापूर मार्गावर असलेल्या रासे फाट्यावरील हॉटेल मराठा मध्ये हॉटेल चालकावर हॉटेल मध्ये आलेल्या तिघांपैकी एकाने गोळीबार केला तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी डोक्याला चाटून गेली. स्वप्निल उर्फ सोप्या शिंदे (वय -32, रा.रासे ता. खेड )याच्यावर गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.यातील आरोपी अजय गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तर आरोपी राहुल पवार व तिसरा फरारी आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर , चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,स्वप्नील शिंदे उर्फ सोप्या याच्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. स्वप्निल शिंदे हॉटेलमध्ये असताना तिघेजण हॉटेलमध्ये आले त्यांच्यात शाब्दिक वादविवाद झाले. त्यानंतर एकमेकांना धक्काबुक्की ही झाली.

तिघांपैकी एकाने तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी स्वप्निल उर्फ सोप्या शिंदे याच्या डोक्याला चाटून गेली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड,पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले. पोलिसांना हॉटेलमध्ये एक राउंड सापडला.

गोळीबार जुन्या वादातून झालेला आहे. स्वप्नील उर्फ सोप्या शिंदे याच्यावर गोळीबार करण्यात आला हा शिंदे सुद्धा तडीपारीतला आरोपी आहे. तसेच अजय गायकवाड व राहुल पवार हे तडीपारितले दोघे आरोपी आहेत. या घटनेनंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली. राहुल पवार व दुसरा आरोपी पळून गेला तर पोलिसांनी अजय गायकवाड याला ताब्यात घेतले आहे, त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.अजय गायकवाड, राहुल पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले आहे.रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार झाला. राहुल पवार याच्या भावाचा काही महिन्यापूर्वी महाळुंगे येथे खून झाला होता. स्वप्नील शिंदे हा सुद्धा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तो तडीपारी झालेला आहे तसेच राहुल पवार, अजय गायकवाड हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

हुतात्मा राजगुरू जन्म स्थळ स्मारकाचे भूमी पूजन संपन्न

0

येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या बहु प्रतिक्षिप्त जन्म स्थळ स्मारकाचे भूमी पूजन आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
महाराष्ट्र सरकारने नुकतेच या कामी १०२ कोटी ४८ लक्ष रुपये मंजूर केले आहेत,त्या निधीतून हुतात्मा राजगुरू यांच्या बलिदान , त्याग यांना साजेसे भव्य दिव्य स्मारक निर्माण होणार आहे.गेली तीस वर्षे हुतात्मा राजगुरू स्मारक होणे कामी विविध संस्था संघटना प्रयत्नशील आहेत.अखेर आता स्मारक बांधकाम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख व सदस्य गेली अनेक दिवस याबाबत पाठपुरावा करत आहे.
आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांनी मागील. वर्षीच्या अर्थ संकल्प अधिवेशनात या स्मारक बांधकाम कामी लक्षवेधी सूचना मांडली होती.सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत समिती तयार करून विकास आराखडा तयार करण्यात आला होता.या आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यात आली.यातून स्मारक बांधकाम कामी व भू संपादन कामी १०२ कोटी ४८ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.
या स्मारक बांधकामाचे भूमिपूजन आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी आमदार मोहिते म्हणाले गेली अनेक वर्षे हुतात्मा राजगुरू स्मारक कामी पाठपुरावा सुरू होता,या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार देवेंद्र फडणवीस,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या सर्वांचे योगदान लाभले, हुतात्मा राजगुरू स्मारकालगत नवीन झालेल्या पुलाचे उद्घाटन पुढील काळात लवकरच करणार आहे.हे स्मारक राजगुरुनगर शहराच्या वैभवात भर घालणारे होईल.देशातील अनेक देशभक्त,युवक येथे येऊन हुतात्मा राजगुरू यांच्या बलिदानाचे स्मरण करून देशभक्तीच्या प्रेरणा घेऊन जातील.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर,कात्रज डेअरी संचालक अरुण चांभारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास लिंभोरे, संचालक भरत कड , माजी सभापती अशोक राक्षे,चंद्रकांत दादा इंगवले, विनायक घुमटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलताई चांभारे महिला शहर अध्यक्ष ॲड.मनीषा पवळे,शहर अध्यक्ष सुभाष होले,युवक अध्यक्ष सागर सातकर ,पी.एम. आर. डी.संचालक वसंत भसे , तसेच ऍड.निलेश आंधळे, स्विय सहाय्यक सतीश कदम, संतोष सांडभोर,बाळासाहेब सांडभोर, ऍड.सूनिल वाळुंज ,अमित घुमटकर ,योगेश पवार ,संतोष भांगे, किशोर ओसवाल,शुभम सोनवणे यांसह मोठ्या संख्येने नागरिक ,महिला उपस्थित होत्या.
या स्मारक बांधकामाच्या नासदिय कंपनी पुणेच्या वास्तुविशारद अर्चना देशमुख यांनी यावेळी स्मारक बांधकाम आराखडा कसा असेल ही माहिती दिली.सवानी हेरिटेज पुणे कंपनीचे राहुल चव्हाण यांनी विविध नकाशे यावेळी सादर केले.
कार्यक्रम संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सागर सातकर, स्वीय सहाय्यक सतीश कदम, ऍड निलेश आंधळे, इजाजभाई तांबोळी शुभम सोनवणे यांनी केले.
कार्यक्रम पौरोहित्य अवधूत प्रसादे,सूत्रसंचालन कैलास दुधाळे ,प्रास्ताविक मधुकर गिलबिले,आभार ॲड.निलेश आंधळे यांनी मानले.

श्री क्षेत्र भीमाशंकर, ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासह जिल्ह्यात ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

0

श्री क्षेत्र भीमाशंकर, ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासह जिल्ह्यात ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

पुणे : वस्त्रसंहितेसह संपूर्ण महाराष्ट्रातील ५२८ हून अधिक मंदिरांमध्ये मंदिरांचे पावित्र्य जपले जाणार ! असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी पुण्यात बोलताना केले. मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झालेली आहे, *अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.* ते पुणे येथील ‘श्रमिक पत्रकार भवन’, गांजवे चौक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या पत्रकार परिषदेसाठी हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे पुणे जिल्हा निमंत्रक ह.भ.प. चोरघे महाराज, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या विश्वस्त श्रीमती संगिताताई ठकार, कऱ्हे पठार खंडोबा मंदिर देवस्थानचे विश्वस्त अधिवक्ता मंगेश जेजुरीकर, श्रीचतुःश्रृंगी देवस्थानचे श्री. नंदकुमार अनगळ, हडपसर येथील श्री तुकाई देवस्थानचे सचिव श्री. सागर तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, पुण्याप्रमाणे यापूर्वीच नागपूर, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, यांसारख्या अनेक जिल्ह्यातील मंदिरांमध्ये ही वस्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे. मंदिर महासंघाच्या प्रयत्नांचे स्वागत होत असून केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये आणि विदेशातील मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्याचा स्तुत्य निर्णय तेथील विश्वस्तांकडून उस्फूर्तपणे घेतला जात आहेत.

वर्ष २०२० मध्ये निधर्मी शासनानेही राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. देशभरातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस ठाणे आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहितेचे काटेकोर पालन होते. याच धर्तीवर हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिरांच्या विश्‍वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्री. घनवट यांनी सांगितले.

श्री. घनवट पुढे म्हणाले, ‘‘५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’मध्ये ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आल्यानंतर महासंघाचे कार्य राज्यभरात उत्तरोत्तर वाढतच आहे. श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी विरोध झाला; मात्र त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली की, काही पुरोमागी, आधुनिकतावादी हे कसे चुकीचे आहे यासाठी टाहो फोडतात. समाजात भारतीय संस्कृतीविषयी चुकीचे विचार पसरवतात; परंतु मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे. मंदिर विश्वतांनी या सर्वांचा अतिशय चांगला विचार केला आणि हा निर्णय घेतला. त्यामुळे येथून पुढे मंदिराचे पावित्र्य अबाधित राहील आणि संस्कृती रक्षणास मदतच होईल.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्‍वर मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथील श्री घृष्णेश्‍वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्‍वेश्‍वर मंदिर, तसेच आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. एवढेच नसून अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळामध्ये ही वस्त्रसंहिता लागू आहे.

महाराष्ट्र शासनाने ‘शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच पायात ‘स्लीपर’ वापरण्यावर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली आहे.

लोकसभेसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर! पुण्यामध्ये उमेदवार कोण?भाजपाचे धक्कातंत्र.

0

लोकसभेसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर! नितीन गडकरी, पंकजा मुंडेंसह २० जणांची नावं जाहीर

महाराष्ट्र, त्रिपुरा, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमधले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

पंकजा मुंडेंना लोकसभेसाठी संधी

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत हिमचाल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा या राज्यातील उमेदवारांची नावं यामध्ये आहेत. विशेष म्हणजे नितीन गडकरी, पंकजा मुंडेंसह महाराष्ट्रातल्या २० उमेदवारांची नावं या यादीमध्ये आहेत. सुधीर मुनंगटीवार, मुरलीधर मोहोळ यांनाही लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच लोकसभेत नशीब आजमावण्याची संधी बीडमधून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या २० जणांची नावं भाजपाने जाहीर केली आहेत. आता आणखी किती जागा भाजपा घेणार आणि शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या वाट्याला किती जागा येणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

महाराष्ट्र भाजपा उमेदवारांची यादी

हिना गावित-नंदुरबार

सुभाष भामरे-धुळे

स्मिता वाघ-जळगाव

रक्षा खडसे-रावेर

अनुप धोत्रे-अकोला

रामदास तडस-वर्धा

नितीन गडकरी-नागपूर

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर

प्रतापराव चिखलीकर-नांदेड

रावसाहेब दानवे-जालना

भारती पवाण-दिंडोरी

कपिल पाटील-भिवंडी

पियूष गोयल-उत्तर मुंबई कोटेचा-मुंबई उत्तर पूर्व

मुरलीधर मोहोळ-पुणे

सुजय विखे पाटील-अहमदनगर

पंकजा मुंडे-बीड

सुधाकर श्रृंगारे-लातूर

रणजीत सिंह नाईक निंबाळकर-माढा

संजयकाका पाटील-सांगली

  • हिमाचल प्रदेशात दोन उमेदवार, कर्नाटकातले २० उमेदवार, मध्यप्रदेशातले पाच उमेदवार, त्रिपुरातला एक उमेदवार, महाराष्ट्रातले २० उमेदवार आणि तेलंगणमधले ६ उमेदवार अशी ७० नावं या यादीत आहेत. या आधी जी यादी जाहीर करण्यात आली त्या यादीत १९५ नावं होती. नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत का नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सातत्याने उपस्थित केला होता. तसंच त्यांना भाजपाला लाथ मारा आणि महाविकास आघाडीसह या अशी ऑफरही उद्धव ठाकरेंनी दिली होती. नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंकडून देण्यात आलेल्या या ऑफरची देवेंद्र फडणवीस यांनी खिल्लीही उडवली होती. आता दुसरी यादी जाहीर झाली असून त्यात भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केल्याचं दिसून येतं आहे.

च-होली खुर्द मध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करोडोंच्या निधी च्या कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.

0

प्रतिनिधी – श्री-योगेश लंघे पाटील                                    च-होली खुर्द- येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या (Charholi) कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा काल दि.10 रोजी संध्याकाळी पार पडला. या वेळी ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच व सदस्य व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.आमदार दिलीपराव मोहीते पाटील यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.                 

 मंजुरी कामे खालीलप्रमाणे                                    १)आळंदी मरकळ रोड ते नानाश्री लॉन्स ते विश्रांतवड रस्ता करणे मंजूर निधी पन्नास लाख,2)आळंदी ते च- होली खुर्द रस्ता काँक्रेट करणे मंजूर निधी पंधरा लाख,3)आळंदी वडगांव रोड ते सुरेश नगर रस्ता डांबरी करण करणे मंजूर निधी वीस लाख,4)ठाकर वस्ती रस्ता काँक्रेट करणे मंजूर निधी दहा लाख रुपये,5) स्वामी समर्थ नगर काँक्रिटीकरण मंजूर निधी वीस लाख रूपये,6)लक्ष्मीनगर( विश्रांतवड) येथील रस्ता करणे मंजूर निधी दहा लाख रुये,7)ग्रामीण आळंदी रस्ते काँक्रिटीकरण करणे (च – होली खुर्द) मंजूर निधी सत्तर लाख रुपये,8) भामणेर धर्मशाळा परिसर बंदिस्त गटर मंजूर निधी दहा लाख रुपये,9)नानाश्री लॉन्स ते मरकळ रोड बंदिस्त गटर मंजूर निधी पंचवीस लाख रुपये ,10)दिलीप कुऱ्हाडे वस्ती ते ठाकर वस्ती रस्ता काँक्रीट करणे मंजूर निधी दहा लाख रुपये,11)पसायदान नगर राममंदिर(रस्ता) मंजूर निधी तीस लाख रुपये,12) बन्सीलाल गोडाऊन रामकृष्ण नगर (रस्ता)मंजूर निधी दहा लाख रुपये,13) च -होली बायपास रोड मंजूर निधी पन्नास लाख रुपये इ. एकूण कामांना 3 कोटी 30 लाख रु.निधी मंजूर झालेला आहे. 

तसेच च-होली खुर्द येथे झालेल्या विविध विकास कामांचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी, सौ आशाताई थोरवे ,(च-होली खुर्द सरपंच) ,श्री पांडाभाऊ थोरवे, (उपसरपंच च-होली खुर्द), सौ शालनताई  पांडुरंग थोरवे, ग्रा.सदस्य. सौ सुवर्णाताई राजकुमार बांगर  ग्रा.पं सदस्य ,निखिलभाऊ थोरवे , (मा.उपसरपंच च-होली खुर्द). श्री  राहुल भोसले ( मा.उपसरपंच.च-होली खुर्द),श्री रवींद्रशेठ कुर्हाडे ग्रा पं सदस्य ,कैलासशेठ थोरवे (मा.उपसरपंच च-होली खुर्द).पांडुरंग पगडे मा.चेअरमन.  श्री राजकुमार बांगर , श्री आतूल पवार , श्री शिवाजी थोरवे ,श्री राहुल थोरवे ,श्री बाळासाहेब थोरवे. संचालक . श्री योगेश हरीभाऊ थोरवे,.वि.का.सो.चेअरमन ,श्री अर्जुन थोरवे, श्री अतुल थोरवे,सुनील साठे , हनुमंत थोरवे, ,विठ्ठल पांडुरंग थोरवे.सत्यवान थोरवे.श्री. आनंदा एकनाथ थोरवे.गणेश राजाराम थोरवे.अशोक अर्जुन थोरवे ,किरण थोरवे ,गणेश आनंदा थोरवे.नाना पारधी.महादु काळे.बाळु केवळ.तुकाराम केवळ.‌ श्री अशोक बाजीराव थोरवे.  विलास काशिराम थोरवे उपसरपंच मा, आण्णा पगडे.आतुल पवार. संचालक ,  , विशाल गरुड  ,शिवाजी महादेव थोरवे या चेअरमन,  गणेश पगडे, बापुसाहेब सस्ते , कृष्णा पांडुरंग थोरवे.  आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक आणि गाढव…

0

एक उमेदवार मत मागण्यासाठी एका म्हाताऱ्याकडे गेला आणि 1000 रुपये धरून म्हणाला बाबाजी कृपया मला यावेळी मत द्या.
बाबा जी म्हणाले:
बेटा, मला पैसे नकोत पण तुला मत हवं आहे तर मला गाढव विकत घेऊन दे!
उमेदवाराला मते हवी होती,
तो गाढव विकत घेण्यासाठी बाहेर पडला,
पण 40,000 पेक्षा कमी किमतीचे गाढव सापडले नाही,
म्हणून परत आला आणि बाबाजींना म्हणाला:
मला वाजवी किंमतीत एकही गाढव सापडले नाही, गाढवाची किंमत किमान 40000 आहे, म्हणून मी तुम्हाला गाढव देऊ शकत नाही पण मी 1000 देऊ शकतो!

बाबा जी म्हणाले:
साहेब, मला आणखी लाजवू नका, तुमच्या नजरेत माझी किंमत गाढवापेक्षा कमी आहे,
जेव्हा गाढव 40000 पेक्षा कमी विकले जात नाही, तेव्हा मी 1000 ला कसा विकला जाऊ शकतो!

म्हणूनच या निवडणुकीत हुशारीने मतदान करा. स्वतःची आणि तुमच्या मताची कदर करा.

शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट… मराठा क्रांती मोर्चा उतरला लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात…१५०० पेक्षा अधिक उमेदवार देण्याची तयारी सुरू…!!

0

शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट… मराठा क्रांती मोर्चा उतरला लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात…१५०० पेक्षा अधिक उमेदवार देण्याची तयारी सुरू…!!

राजगुरुनगर : शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या डॉक्टर अमोल कोल्हे हे एकमेव उमेदवार असल्याचे सध्याचे चित्र होते. खा.अमोल कोल्हे हे सगळीकडे प्रचारासाठी फिरताना दिसत आहेत. महाविकास आघाडी तर्फे ते शिरूर लोकसभेचे उमेदवार असतील यात आता शंका राहिलेली नाही. महायुतीचे उमेदवार अजूनही निश्चित झालेले नाहीत. असे असताना पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक आज पिंपरी चिंचवड शहरात पार पडली. यावेळी झालेल्या निर्णयानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघात १५०० पेक्षा अधिक उमेदवार स्वइच्छेने निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सध्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी २५,०००/-₹ इतकी अनामत रक्कम असून इतर मागास प्रवर्गासाठी १२,५००/-₹ इतकी अनामत रक्कम भरावी लागणार आहे. जर १५०० पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर अनामत रकमेच्या माध्यमातून निधी शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे.
मात्र मग आता क्रांती मोर्चा ने घेतलेले या निर्णयामुळे येत्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता या सगळ्याचा फटका कोणाला बसणार हे पुढील काळात पहावे लागणार आहे. सध्याची यादी खेड तालुक्यातून जाहीर करण्यात आली असून ती पुढील प्रमाणे आहे. यात अनेक उमेदवारांची भर पडताना दिसून येत आहे.

सकल मराठा समाज ,मराठा क्रांती मोर्चा ( शिरूर लोकसभा ) २०२४ उमेदवार यादी…
खेड तालुक्यातील उमेदवार

१) अंकुश सुदाम राक्षे (बहिरवाडी)
२) मनोहर महादेव वाडेकर (चाकण)
३) अनिल भिमजी राक्षे (राक्षेवाडी)
४) शंकर रामदास राक्षे (राजगुरूनगर)
५)अशोक नारायण मांडेकर (आंबेठाण)
६) निलेश बाळासाहेब आंधळे(राजगुरूनगर)
७)सुदाम बाजीराव काराळे (वाफगाव)
८) सुदाम नाईकरे (कमान)
९)कुंडलिक बबन कोहीनकर (कोहिंकरवाडी)
१०) बाबाजी मोहन कौटकर (चाकण)
११) मारुती काळूराम चौधरी (गोळेगव)
१२)संजय तुकाराम जाधव (वांद्रा)
१३) मंगेश गुलाब सावंत (शिरोली)
१४)अंकुश भास्कर काळे (वराळे)
१५) दिलीप दत्तात्रय होले( होलेवाडी)
१६) कुशल चनद्रमुळे जाधव( चाकण)
१७) विजय जैद (जैदवाडी)
१८) सचिन बाबुराव राक्षे(बहिरवाडी)
१९) राहुल आनंदराव नाईकवाडी (चाकण)
२०)अमोल ज्ञानेश्वर नाईकरे (कमान)
२१) संदेश गणपत पाचारणे (सांडभोरवाडी)
२२)वामन बाजारे (राजगुरूनगर)
२३) चेतन मोहन शेट्टे (सातकरस्थळ)
२४) मनोज राऊत (मोखल)
२५) अभिलाष पाचारने (सांडभोरवाडी)
२६)किरण राधमन चोरघे ( रोंधळवाडी)
२७) शिवाजी बापूसाहेब शिंदे (आंबोली)
२८) अविनाश अंनादा टोपे (वाकी)
२९)दिलीप नामदेव ढेरंगे (गुळणी)
३०) अतिश अरुण मांजरे (चाकण)
३१) भालचंद्र शंकर पिंगळे( चाकण)
३२) भगवान निवृत्ती मेदनकर ( मेदनकरवाडी)
३३) व्यंकटेश राजाराम सोरटे ( चाकण)
३४) नरेंद्र संभाजी वाळूंज ( वाकळवाडी)
३५) शाम कोंडीबा राक्षे ( राक्षेवाडी)
३६) जगन्नाथ बाळासाहेब राक्षे ( बहिरवाडी)
३७) सतीश तनपुरे( बिबी)
३८) अभिषेक विलास रणपिसे( सातकरस्थळ)
३९) विकास शंकर वाडेकर (चाकण)
४०) शुभम बाळासाहेब घाडगे ( राजगुरूनगर)
४१) सुदाम बाबुराव राक्षे (राजगुरूनगर)
४२) योगेश मधुकर वाडेकर ( चाकण)
४३)शार्दुल संजय वाडेकर (चाकण)
४४) महेश आप्पा शेट्टे (पाईट)
४५) वैभव दत्तात्रय राक्षे ( बहिरवाडी)
४६) प्रकाश मच्छिंद्र शिंदे ( राजगुरूनगर)
४७) विकास बाळासाहेब ठाकूर ( ठाकूर पिंपरी)
४८)गणेश विलास वाडेकर ( चाकण)
४९) श्रीकांत रमेश वाडेकर (चाकण)
५०) योगेश मधुकर वाडेकर ( चाकण)
५१)भागवत कोंडीबा शेजुळ (आळंदी)
५२) श्रीकांत जयसिंग काकडे (आळंदी)
५३) रमाकांत शिंदे ( आळंदी)
५४) राकेश चव्हाण ( वडगाव)
५५) जिजाभाऊ तुकाराम मेदगे ( औदर)
५६) राजेंद्र टाकळकर ( वाफगाव)
५७) कमलेश गुलाब पठारे ( पठारवाडी)
५८) अमित भरतराव टाकळकर ( राजगुरूनगर)
५९) साहेबराव नारायण जाधव ( वाकी)
६०)प्रमोद भिमदास कड ( कुरुळी)
६१) विजय रमेश नाईकरे (कमान)
६२) दत्तात्रय विष्णु कंद (गारगोटवाडी)
६३) गणेश हरिभाऊ भोर आंबेगाव अवसरी खुर्द
अजून कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी आपली नावे ,गावाचे नाव आणि फोन नंबर यात समाविष्ट करावा व आम्हाला पाठवावा. असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा तर्फे करण्यात आले आहे. यांना उमेदवारी अर्ज भरायचे आहेत त्यांनी ९८५०६१४२१४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.